*हरिजवळगा येथे तालुकास्तरीय वारकरी मेळावा*

*वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र च्या वतीने आज दि. ११ सप्टेंबर रोजी तालुकास्तरीय वारकरी मेळावा निलंगा तालुक्यातील हारीजवळगा येथे संपन्न होत आहे. यावेळी वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल पाटील सांगलीकर निलंगा विधानसभेचे लोकप्रिय नेते मा.अशोक शिवाजीरावजी पाटील निलंगेकर ( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ),  औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे वडील  ह.भ.प. दत्तात्रय पवार,मुख्याध्यापक सुरेंद्र धुमाळ, शिवसेनेचे निलंगा तालुका प्रमुख अविनाश रेशमे, निलंगा पंचायत समिती चे माजी सभापती अजितराव माने,माजी नगराध्यक्ष हमीद शेख,ओबीसी नेते प्रा.दयानंद चोपणे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव,दिलीप हुलसुर,रमेश मोगरगे,  बालाजी पाटील,झटीगराव म्हेत्रे, आदींसह निलंगा तालुक्यातील वारकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत.

Post a Comment

0 Comments