श्री गणेश विसर्जन मिरवणूक व विहिरीची अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडून पाहणी 
औसा प्रतिनिधी

 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज होणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणि विसर्जन स्थळाच्या विहिरीची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी औसा  शहरातील विसर्जन मिरवणूक मार्ग आणि विसर्जन विहिरीची पाहणी केली.औसा शहरात होणारे गणेश विसर्जन हे शांततापूर्ण वातावरणामध्ये व सर्व धर्मीय बांधवांना सोबत घेऊन संपन्न होण्यासाठी हिंदू मुस्लिम व इतर सर्व धर्मीय बांधवांना विश्वासात घेऊन कोणतेही गालबोट न लागता विसर्जन संपन्न व्हावे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी सूचना दिल्या. या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार आणि पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनीही पोलीस बांधवांना अशा सूचना दिल्या असल्याची माहिती यावेळी दिली. औसा शहरातील नागरिक हे श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये भक्तीभावाने सर्व धर्मीय बांधव सहभागी होण्याची परंपरा आहे तरीही पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन विसर्जन शांततेत पार पाडावे म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी पोलीस निरीक्षक यांनी दिली. यावेळी बीट अंमलदार रुद्र डीगे,  महादेव आवटे व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments