ना अतुल सावे यांच्या हस्ते वारकरी मंडळाचे गोविंद तावसे  यांचा सत्कार
 औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांच्या हस्ते अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका उपाध्यक्ष गोविंद तावसे जयनगर यांचा औरंगाबाद येथे सत्कार करण्यात आला. संभाजी नगर गणेश मंडळाच्या वतीने सार्वजनिक विसर्जन मिरवणूक प्रसंगी नामदार अतुल सावे यांनी हा सत्कार केला. यावेळी औरंगाबादचे महापौर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोविंद तावसे यांच्या या सत्कार बद्दल अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष ह भ प खंडू महाराज भादेकर, सर्वश्री दिनकर निकम, सतीश जाधव, संपर्कप्रमुख गोरोबा कुरे, समाज कल्याण प्रमुख सिद्रामाप्पा राचट्टे, दगडूपंथ जोशी, शंकरराव जाधव, आत्माराम मिरकले, सौ सुरेखा पाठक, सौ रंजना खुरपे, सौ लक्ष्मीबाई माळी, जीवराज मातोळे यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments