इनामी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळावा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी 

 शासनाच्या योजनेचा लाभापासून वंचित असलेल्या इनामी जमीन  शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी एम. आय. एम. च्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे की, यावर्षी सतत पावसामुळे व गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यात दुबार पेरणी करुनही कांहीचे मध्यंतरी काळात पावसाने दडी मारल्याने शेतीचे नुकसान झाले व त्यानंतर सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे व त्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात गोगलगाई, जागेजागी अतिवृष्ठी झाली आहे. तसेच आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात शेतीचे सतत पाऊसामुळे नुकसान झाले आहे. हे नुकसान देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कृषि मंत्र्यांनी स्वतः दौरा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच पार्श्वभूमिवर औसा तालुक्यातील एकही शेतकरी आश्वासन कृषि मंत्र्यांनी दिले आहे. औसा तालुक्यातील इनाम जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा बऱ्याच दिवसापासुन लाभ मिळत नाही व शासनाच्या योजनेपासून नेहमी वंचित रहावे लागत आहे.
 तरी शासनाच्या योजनेत ७/१२ मधील इतर अधिकारात असलेले इनाम जमीनीचे  सदर नुकसान भरपाई मिळण्याबाबत योग्य ते सहकार्य करण्यात यावे.व शासनाच्या योजनेचा लाभापासून वंचित असलेल्या इनाम जमीन शेतकऱ्यांना शासनाचा अनुदानाचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे. अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख  सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments