भादा येथे अनेक महीन्यांच्या पाठपुराव्यानंतर ओपन जिमला मिळाला मुहूर्त;जिम सुरू
गावच्या विकासात्मक सौंदर्यात भर 
औसा प्रतिनिधी 
‌ औसा- तालुक्यातील भादा येथील नागरिकांची गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती की या ठिकाणी जिम सुरू करण्यात यावी.
परंतु या गोष्टीकडे स्थानिक पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा पाठपुरावा प्रशासकीय स्तरावर कमी पडत होता काय? यामुळे ही ओपन जिम तयार होण्यासाठी अनेक दिवस- महिने रेंगाळत पडलेले काम नुकतेच पूर्ण झाले असून या जीममुळे आता अनेक तरुणांना व्यायामाची सवय जडणार आहे, आणि गेल्या अनेक दिवसापासून च्या पाठपुराव्याने ही जिम पोलीस ठाणे परिसर भागात सुरू झाल्याने भादा तालुका औसा येथील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
औसा तालुक्यातील भादा हे गाव लोकसंख्येने दहा हजार च्या जवळपास असून या औसा तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये हे गाव असून चार ते पाच ठिकाणी वसलेले असून प्रत्येक भागामध्ये जिम असणे आवश्यक आहे.
परंतु गेल्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नाने आता या ठिकाणी एक ओपन जिम सुरू करण्यात आली आहे. तर इतरही विविध भागांमध्ये ओपन जिम किंवा बंदिस्त जिमची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
गावामध्ये जिम होण्याच्या दृष्टीने उपसरपंच बालाजी शिंदे ग्रामविकास अधिकारी माणिक सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत उबाळे, अमोल पाटील, योगेश लटूरे, व इतर सामाजिक कार्यकर्ते आदींनी प्रयत्न केल्याने ही एक जिम उभा करण्यात यश आले असल्याची गावामध्ये चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments