"माझा एक दिवस माझ्या बळीराजा साठी"  हा महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम शेतकऱ्यां पर्यंत 
औसा प्रतिनिधी 

 औसा दि.२२सप्टेबर रोजी मौ. लाडवाडी ता. औसा येथे संध्याकाळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती इतरही शेती विषयक माहिती विविध योजना यांच्या विषयी माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या गावांमध्ये उपलब्ध व्हावी याकरिता महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी किल्लारी श्री.  रेवशेट्टे आर.डी यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या यांत्रिकीकरण, गट शेती, आपल्या मालाची मार्केटिंग, बाजाराचा अभ्यास,पीक लागवडीच्या पद्धती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, इत्यादी बाबत अतिशय सविस्तर असे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न जाणून घेऊन प्रलंबित बाबीचा निपटारा करण्यासाठी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.सेवा पंधरवडा सुरू असल्याने विविध योजनांचे अर्ज करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. हा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेस आयोजित करण्यात आला होता त्यामुळे शेतकरी अतिशय उत्साहात मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील ग्रामपंचायत सदस्य श्री. पद्माकर तौर यांनी शेतकऱ्यांना व्हिडिओ दाखवण्यासाठी दूरचित्रवाणी व साऊंड सिस्टिम ची तसेच प्रकाश व बसण्याची उत्तम व्यवस्था केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रात उत्तम फळबागांच्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्हिडिओ ,गावातील शिक्षण व्यवस्था स्वच्छता शेतकऱ्यांची आपल्या गावा प्रितीची आपुलकी पाहता आली. "मी समृद्ध तर माझा गाव समृद्ध" या उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यास अनुकूल असणारे अनेक व्हिडिओओ दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबाग लागवड, आधुनिक शेती, गट शेती करण्याचा बसून त्याच ठिकाणी निश्चय केलेला आहे.गावचे कृषी सहाय्यक श्री. सोदले यांनी उत्तम प्रशिक्षण साहित्य उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या समस्या व प्रलंबित प्रस्ताव निकाली काढण्याबाबत मार्गदर्शन केले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत येणाऱ्या विविध फळबाग लागवड शेततळे गांडूळ खत उत्पादन युनिट,  नाडेप युनिट, सेंद्रिय शेती याबद्दल चर्चा करण्यात आली.तसेच कृषी सहाय्यक श्री. वाघमारे एम.जी यांनी शेतकऱ्यांना फळबागेची शेती याबद्दल मार्गदर्शन केले, ग्रामपंचायत सदस्य श्री पद्माकर तौर यांनी शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचे महत्त्व व एकत्रित येऊन कामे करण्याचे महत्व सर्व शेतकरी बांधवांना पटवून सांगितले.व शासनाच्या विविध योजनांसाठी पुढाकार घेऊन लोकसहभाग देण्याचे आवाहन केले. शासनाच्या प्रत्येक विभागाने अशा प्रकारचा एक दिवस ठरवून गावात येऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन करावे अशी इच्छा व्यक्त केली. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा, ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान केला.आणि उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम सायंकाळी ७ ते  रात्री ११वाजेपर्यंत चालला याप्रसंगी गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments