सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार
 औसा प्रतिनिधी 
औसा येथील सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने औसा शहरातील विविध जाती धर्मातील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष वैजनाथ ईळेकर, शेखर लद्दे, राजाभाऊ नागराळे, नगरसेवक गोपाळ धानोरे, भाजप गटनेते सुनील उटगे, संजय माळी, धर्मेंद्र बिसेनी, पुरोहित राजाभाऊ पाठक, शिवशंकर सुतार, महादेव कांबळे, पत्रकार रमेश दूरूगकर, राम कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सार्वजनिक नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. चिंतामणी गणेश मंदिरा जवळ गणेश उत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी श्री काजी यांच्यासारख्या मुस्लिम तरुणास अध्यक्ष करून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमासाठी  गिरीश ईळेकर, प्रवीण कारंजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या संकल्पनेचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments