सेवा पंधरवाडा व दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त आ. पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ
 औसा प्रतिनिधी
 दिनांक 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती हा कालावधी राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. सेवा पंधरवाडा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त औसा येथे स्वामी रामानंद तीर्थ पुतळा परिसरामध्ये आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना डांगे, सोनाली गुळबिले, जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, दिगंबर माळी, कंठप्पा मुळे, सदस्य दौलत वाघमारे, शहराध्यक्ष लहू कांबळे, कुणाल दीक्षित, बालाजी शिंदे, सरपंच कमलेश पटेल मातोळे, पत्रकार राम कांबळे, वीरभद्र कोपरे, धनंजय पर्सने, शिवरुद्र मुर्गे, गोविंद कांबळे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments