गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शिवकिर्तन..

 गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शिवकिर्तन.. 




औसा/ प्रतिनिधी : - हिरेमठ संस्थांनचे लिं.निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या 15व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आज शुक्रवार दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9 : 00 ते 11 : 00 या वेळेत गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या पावन समाधीस महारुद्र अभिषेक व भजन, शिवपाठ अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री 9 : 00 ते 12 : 00 या वेळेमध्ये वेदमूर्ती विवेकानंद स्वामी साकोळकर यांचे शिव किर्तन व रात्री शिवजागर सोहळा होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांनचे मार्गदर्शक डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज व पिठाधिपती ष.ब्र.108 श्री निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या वतीने श्री सुभाषप्पा मुक्ता वीरशैव समाजाचे अध्यक्ष व वीरशैव युवक संघटना औसा यांच्या वतीने करण्यात येते..

Post a Comment

0 Comments