परळी नगर परिषद डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव सेवानिवृत्त

परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :-  
 परळी नगरपालिकेच्या डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव हे दि.30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले.सेवानिवृत्तीबद्दल त्यांना वाचनालयाचे कर्मचारी व मित्रपरिवाराने निरोप दिला.
   नगर परिषद डॉ.भालचंद्र वाचनालयाचे ग्रंथपाल रावसाहेब जाधव यांनी परळी नगरपालिकेची 39 वर्षे सेवा केली.दि.4 एप्रिल 1984 रोजी रुजु झाल्यानंतर 1989 पर्यंत जकात विभागात,1989 ते 1995 या कालावधीत आवक- जावक विभागात 1996 ते 2003 या कालावधीत नविन नळ जोडणी, 2004 ते 2015 या कालावधीत सहाय्यक भांडारपाल,विद्युत विभागात विभागप्रमुख व 2015 पासुन पासुन डॉ.भालचंद्र वाचनालयात ग्रंथपाल म्हणुन आजपर्यंत सेवा केली.शुक्रवार दि.30 रोजी 58 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.यानिमीत्त डॉ.भालचंद्र वाचनालयात झालेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास विक्रम देशमुख, राजाराम देशमूख, रमाकांत  कौलवार, भास्करराव पाटील, सिद्धेश्वर मोगरकर, पत्रकार धनंजय आढाव, गोविंद चाडकं, यशवंत चव्हाण, संतोष घुमरे, लालासाहेब जाधव, गिरीश जाधव, नानासाहेब जाधव व डॉ. भालचंद्र वाचनालयचे गंगाधर जगतकर, संजय जाधव, सविता बारड, भगवान काकडे, महादेव गित्ते व इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments