*जनसेवक नरेंद्र मोदी जी*
भारताचे आदरणीय पंतप्रधान मा. नरेंद्र जी मोदी... यांचा आज वाढदिवस. गुजरात मधील वडनगर येथील एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या मुलाने आयुष्यात मोठा संघर्ष करीत आपल्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करून सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतभूमी चा पंतप्रधान होण्याची किमया साधली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून आपल्या कारकीदींची सुरुवात करीत यशाचा एक एक टप्पा पार केला. तेरा वर्षे गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्या यशस्वी कारकिर्दीच्या माध्यमातून आपले नेतृत्व शुद्ध केले,
भारतीय जनता पक्षाच्या पारखी नेतृत्वाने मोदीजींच्या असामान्य नेतृत्व क्षमतेला ओळखून २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून संधी दिली. आदरणीय मोदीजींनी या संधीचे अक्षरश: सोने केले .
एकेकाळी फक्त
. दोन खासदारांचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला एकहाती सत्ता मिळवून दिली. इथूनच मोदी युगाचा प्रारंभ झाला. सबका साथ सबका विकास या धोरणाचा अवलंब करून आत्मनिर्भर, विकसित तसेच सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या वाटेने गतिमान होणाऱ्या सक्षम भारताच्या निर्माण कार्याचा ध्यास घेतला,
लालबहादूर यांनी जय जवान जय किसान या मंत्राला नजरेसमोर
ठेवून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी किसान सन्मान निधी
योजना व विविध योजना राबवण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे देशाच्या सीमा सुरक्षित राहाव्यात यासाठी भारतीय सैन्य दलाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या,
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करीत आहोत, त्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या भावी पिढीचा विचार करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले, . देशातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास गंगा पोहोचली पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. प्रधानमंत्री पीकविमा योजना, प्रधानमंत्री आवास,पंतप्रधान ग्राम सडक योजना, उज्ज्वला गॅस योजना,जण औषधी
अशा विविध योजना सुरू केल्या विकास आणखी गतिमान होण्यासाठी समृद्धी महामार्ग बुलेट ट्रेन यासारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना हाती घेतले जागतिक पातळीवर विविध देशाच्या राष्ट्रप्रमुखांची संवाद साधून आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला बळकटी दिली मन की बात अभिनव उपक्रमाच्या मदतीने संपूर्ण देशवासियांसी संवाद साधत संपूर्ण राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी प्रयत्न केले *एका आदिवासी महिलेला एका मागासवर्गीय व्यक्तीला देशाच्या सर्वोच्च पदी बसविण्यात मोदीजींच्या कुशल व सर्व समावेशक नेतृत्वाची ओळख पटते*,
*इतिहासातले पाहिले पंतप्रधान आहेत,ज्यांनी सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतन्याचे पवित्र कार्य केले*, अशा युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्वाच्या नेतृत्वात आपला भारत देश सातत्याने प्रगतीपथावर राहून जागतिक महासत्ता बनणार हे निश्चित आहे कोरोना सारख्या वैश्विक महामारी मध्ये विविध राज्यांना मोफत व्हॅक्सिनेशन देण्याचे कार्य हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी केले आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून बऱ्याच युवकांना रोजगार उपलब्ध झाली कोरोनाच्या काळामध्ये वेळोवेळी गॅस ऑक्सिजन सारखा पुरवठा करण्यात आला रशिया व युक्रेनच्या युद्धामध्ये भारतीय युवक जे युक्रेनमध्ये शिक्षण घेत होते मिशनगंगाच्या माध्यमातून आपल्या भारत देशाच्या युवकांना भारतापर्यंत सुखाने पोहोचवण्याचं कार्य केले देशांमध्ये पूर्णत्व लॉकडाऊन सारखी परिस्थिती कोरोनाच्या काळात झाली असता गोरगरीब जनतेला मोफत धान्य देण्याचं कार्य केलं हे आहे,आणि आज ही गोर गरीब जनतेला मोफत धान्य देण्याचे काम मोदी जी करत आहेत,
*राजकारणा सोबतच ते एक शिव भक्त आहेत*,केदारनाथ व कैलास मानसरोवर ला जाणाऱ्या भक्तांना चांगला रस्त्याच्या कामाची सुरुवात केली, ज्या वाराणसी मतदार संघात ते निवडून येतात,हिंदुत्वाचे श्रद्धा स्थान असलेले,बाबा काशी विश्वनाथ चे मंदिर आज भव्य दिव्य उभा झालेले आहे, या सह बऱ्याच मंदिराचे विकास कार्य प्रगती पथावर आहे,
*जहा बलिदान हुवे मुखर्जी वो काश्मीर हमारा है*
धारा ३७० हटवून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, तीन तलाक या सारखेही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले,
अशा महान जनसेवकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सुनील उटगे
0 Comments