औसा शहरातील जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा तिसरा टप्पा मुख्य रस्ता अतिशय खराब झाला असुन तो तातडीने दुरुस्त करण्यात यावा या मागणीसाठी एम आय एम च्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे औसा शहरातील बरेच दिवसांपासून रखडलेला तिसरा टप्पा रस्ता अतिशय खराब झाला असून त्या रस्त्यांवर गणेश विसर्जनाच्या वेळी मुरुम,कच टाकण्यात आले होते.त़ो पावसामुळे चिखल होऊन जागो जागी खड्डे पडून रस्ता पुन्हा अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर दोन चाकी व चारचाकी येणाऱ्या जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तरी तो रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा जेणेकरून औसा शहरात व तालुक्यातील येणाऱ्या जाणाऱ्या जनतेची हेळसांड होणार नाही.तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी एम आय एमच्या वतीने आंदोलन केले असताना सध्या निधी नाही,निधी आल्यानंतर काम करुन घेण्यात येईल असे आश्वासन नगरपालिका तर्फे देण्यात आले होते. आतापर्यंत बराच निधी येऊन दुसरीकडे कामे करण्यात आली व जाणून बुजून शहरातील व्यापा-यांना व गोरगरीब जनतेला त्रास देण्याचे काम पालिका प्रशासनातर्फे होत आहे. तरी पालिकेने जनतेची होत असलेली पिळवणूक थांबविण्यात यावी.व तिसरा टप्पा होण्या ऐवजी सद्या जाण्या येण्यासाठी डांबरी रस्ता करुन देण्यात यावा.अशी मागणी वारंवार करुन ही कसल्याही प्रकारची नगरपालिका याच्यावर दखल घेत नसल्यामुळे नगर प्रशासन कॉन्सिल अस्तित्वात नसल्यामुळे नगर प्रशासनाने मुख्याधिकारी वेळेवर राहत नाहीत, ते प्रभारी आहेत,व नगर प्रशासन सुध्दा प्रभारी आहे.जनतेने तक्रार कोणाकडे करायचे हे मोठे प्रश्न जनतेसमोर उभे आहेत.व त्याचा फायदा घेऊन सर्वसाधारण माणसाचा बाहेर गावाहून येणाऱ्यांना खुप त्रास होत आहे.तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना जामा मस्जिद ते लातूर वेस हनुमान मंदिर पर्यंतचा मुख्य रस्ता तातडीने दुरुस्त करावा अन्यथा एम आय एमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी दिनांक 13 संप्टेंबर मंगळवार रोजी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 Comments