एकंबी येथे गौरी पूजन आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम
औसा प्रतिनिधी
गौरी पूजन आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने मौजे एकंबी तालुका औसा येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आज ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वा.श्री गणपतीच्या महाआरतीसह गावात रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एकंबी नगरीतील युवकांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औशाचे लोकप्रिय आ.अभिमन्यूजी पवार साहेब यांचे सुपुत्र भाजपा युवा नेते परीक्षित पवार,मनसे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे,गावचे सुपुत्र अँड.श्रीकांतजी सूर्यवंशी, शेतकऱ्याची पोरं संघटनेचे अजिंक्य शिंदे,राष्ट्रवादीचे युवा नेते राज पाटील,मनसेचे जिल्हा सचिव धनराज गिरी,तालुका सचिव जीवन जंगाले,प्रहारचे लक्ष्मण राऊत यांच्या सह विविध संघटना,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आमंत्रित केले होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुमानगिरी महाराज यांच्यासह पत्रकार चंद्रकांत ढवन,केतनजी ढवन,संजय रंदवे,तानाजी गरड,विवेक मावरकर,बाळू घोडके,राम डीगे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक राहुल रोंगे पाटील,दत्ता पाटील,हृदयनाथ कदम,भगवंत कदम,विशाल रणखांब,रामकिशन कास्ते,मनोज पाटील,परमेश्वर जगताप,प्रदूभन सूर्यवंशी,पंकज रणखांब,पवन सूर्यवंशी,सुदर्शन सूर्यवंशी,राहुल भोसले,दत्तप्रसाद मानधने,रोहित गुंड,दिनेश गव्हाणे,चैतन्य पांचाळ, भाऊसाहेब मते,सुरज रोंगे, सुधाकर मते,विठ्ठल काळे,श्रावण गव्हाणे,अभिषेक सूर्यवंशी, अविनाश कांबळे,शत्रगुण रणशिंगे इत्यादी युवक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील स्तुत्य अशा उपक्रमाचे व कार्यक्रमाचे आयोजक व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.
0 Comments