ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत शिक्षक दिन साजरा
औसा (प्रतिनिधी) येथील नबी नगर स्थित ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत मोठया उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेत देखील 5 सप्टेंबर रोजी सर्व माता पालकांच्या उपस्थितीत शिक्षक दिन पार पडला.शिक्षक दिनाच्या दिवशी एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना दिला जातो.अगदी तसाच अनुभव ऑर्बीट प्री-प्रायमरी इंग्रजी शाळेतील इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात आला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या नर्सरी ते पहिलीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची सर्व कामे वाटून घेतली.एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातील भूमिका काही विद्यार्थ्यांनी पार पाडल्या.5 सप्टेंबर या दिवशी संपूर्ण शाळा विद्यार्थी शिक्षकांनी चालवली.शिकवणाऱ्या विद्यार्थी शिक्षकांसाठी व शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी हा एक वेगळा अनुभव होता.सकाळी नऊ ते बारा या वेळामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी अध्यापन केले,त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोगताचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला सर्व माता पालक उपस्थित होत्या.माता पालकांनी देखील शिक्षक दिनाच्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.त्याचबरोबर एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.विद्यार्थ्यांतून मुख्याध्यापिका म्हणून कुमारकिरी कदबानो हैदरअली तर शिक्षक म्हणून शेख मरीयम मजहर,शेख सलमान निजाम, बागवान खुशनूद मजीद,बागवान मुज्जकीर असलम,बागवान अ.समद कोंडाजी, पटेल अर्श अमीर, काझी रिमशा रोशनअली,बागवान रिजवान अजीम,पटेल मोहम्मद शादूल, बागवान महेबुब जावीद यांनी कामकाज पाहिले.विद्यार्थ्यांसाठी ग्रीटिंग कार्ड बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती.सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे ग्रीटिंग कार्ड बनविले होते.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजुमनेहा इकबाल शेख यांनी अध्यक्षीय भाषण करून विद्यार्थ्यांना आता समजले असेल की शिक्षकांना त्रास देणे कसे चुकीचे असते,खोड्या करने,शिक्षकांच्या तासाला मस्ती करने किती चांगले वाटते परंतु शिक्षकांना शिकविते वेळेस याचा त्रास किती होतो हे तर आता सर्वांना समजले असेल असे विचार मांडून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील शिक्षिका पठाण तहेनियत यांनी सर्व उपस्थित माता पालक,इतर सहकारी शिक्षिका सय्यद आयेशा,बुशरा पंजेशा आणि एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांचे आणि इतर सर्वच विद्यार्थ्यांचे आभार मानले.शिक्षक दिन हा दिवस आमच्यासाठी कसा मजेशीर असतो. याविषयी आपले अनुभव देखील मांडले.अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments