मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी स्वामी रामानंद तीर्थ यांना औसा येथे अभिवादन
 औसा प्रतिनिधी
 मराठवाडा मुक्ती संग्रामाचे आद्य प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांना औसा येथील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नी लक्ष्मीबाई दंडे हैदराबाद यांनी औसा येथील खादी कार्यालयासमोर स्वामी रामानंद तीर्थ यांचा पुतळा बसविला आहे. या पुतळ्यास औसा येथे सर्वश्री कंठप्पा मुळे, नारायण सोळुंके, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संतोष मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, भिमाशंकर मिटकरी,महिला आघाडीच्या प्रदेश सचिव कल्पना डांगे, सोनाली गुळबिले, जगदीश चव्हाण, अच्युत पाटील, सामाजिक कार्यकर्ते राम कांबळे, शरद बनसोडे, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक रघुनाथ पोतदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments