अँड एस एस पाटील व चंद्रकांत कापसे  यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व गायन भजन कार्यक्रम संपन्न 

औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्यातील आलमला येथील  श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे दिवंगत अध्यक्ष तथा श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे दिवंगत चेअरमन अँड.एस एस पाटील व चंद्रकांत कापसे यांच्या स्मरणार्थ श्री रामनाथ गणेश मंडळ आलमला व  लातूर ब्लड बँक व महिला भजनी मंडळ लातूर  यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व गायन भजन कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.या शिबिरामध्ये 35 युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून रक्तदान हे जीवनदान याची प्रचिती आणून दिली. शिबिराचे उद्घाटन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव कुंभार यांच्या हस्ते व रामनाथ गणेश मंडळाच्या गणपतींची संध्याकाळची आरती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे यांच्या हस्ते करण्यात आली.  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनीही गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करता यावा या हेतूने या उपक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमास आर्ट लिविंग चे केदार गाजरे, डॉ अमर धाराशिवे,श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बसवेश्वर धाराशिवे, रामनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड उमेश पाटील, महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा सचिव प्रभाकर कापसे, सरपंच कैलास निलंगेकर,भाजपा युवा अध्यक्ष कमलेश निलंगेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विरभद्र बेरुळे,पी सी पाटील, संगमेश्वर पाटील या मान्यवरांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री रामनाथ गणेश मंडळाचे अध्यक्ष कैलास कापसे, सचिव अप्पासाहेब आडसुळे, आबासाहेब लांडगे, खंडू मस्के, दत्ता राऊत व सर्व मंडळाचे सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष विरभद्र बेरुळे, शंकर धाराशिवे, उद्धव जडगे, आदाम फाजल, प्रविण जगदाळे, महादेव मगर,  अण्णासाहेब गायकवाड, खादर वडवळे , विशाल निलंगेकर, राजु गुंजीतकर, संगमेश्वर हुरदळे, महेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments