भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महेश खोसे यांचा भाजपात जाहीर प्रवेश !

(पोहनेर) पोहनेर गावचे तळमळीने सामाजिक काम करणारे महेश खोसे यांचा माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात जाहीर प्रवेश करण्यात आला. या प्रवेश प्रसंगी भाजपाचे परळी तालुका अध्यक्ष सतीश मुंडे हे उपस्थित होते. महेश खोसे यांच्या पक्षप्रवेशामुळे पोहनेर येथील भारतीय जनता पार्टी यांची ताकद वाढली आहे. पक्षप्रवेश करतेवेळी महेश खोसे म्हणाले की, लोकनेत्या पंकजाताई मुंडे व डॉ. खा. प्रीतम ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे काम करून पोहनेर येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले .महेश खोसे यांच्याशी संवाद साधताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, आपण एक दिलाने काम करा. अशी सूचना  पोहनेर येथील पक्ष कार्यकर्तेना केली. महेश खोसे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांनी महेश खोसेचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या! या प्रवेश प्रसंगी पोहनेर येथील सागर देशमुख, मदन काकडे व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments