राठोडा गावातील लोकांनी घेतला दारूबंदी चा निर्णय ;पोलीस निरीक्षक बी.आर शेजाळ यांची उपस्थिती
केळगाव प्रतिनिधी : निलंगा तालुक्यातील राठोडा गावातील लोकांनी दिनांक 24 संप्टेंबर शनीवार रोजी गावामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष अन्नासाहेब सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेऊन दारूबंदी चा कार्यक्रम राबविण्यात आला.
राठोडा गावामधे मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री केली जात होती त्यामुळे व्यसनाधीनता वाढली असून अनेक तरुण याकडे आरक्षित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून गावातील शांतता भंग झाली असून गावकरी महिला व शालेय विद्यारथ्यांवर त्याचे परिणाम होत आहेत.गावामध्ये काही लोक अवैध्य दारू विक्री करत असून त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता यामुळेच आज गावातील लोकांनी दारूबंदी चा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील लोकांनी सहभागी होऊन दारुबंदी साठी प्रतिसाद दिला यामध्ये महिलांचाही सहभाग दिसून आला.या्वेळी निलंगा पोलिस निरीक्षक  बाळकृष्ण शेजाळ यांच्या उपस्थित हा ठराव घेण्यात आला होते.
जर प्रत्येक गावातील सरपंचाने ठाम भूमिका घेऊन जर ठरवले तर गावात अवैध दारू विक्री शक्य नाही असे ग्रामस्थांना बोलताना पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments