संभाजी ब्रिगेड शहर प्रमुख पदी महेबुब इमामसाब खडकाले यांची नियुक्ती.
औसा (प्रतिनिधी)
 संभाजी ब्रिगेड या क्रांतीकारी वैचारिक चळवळीसाठी वेळ,श्रम,बुद्धि,पैसा,कौशल्य हे पंचदान देऊन संघटनेत सातत्याने कार्यरत राहून केलेल्या कार्याची दखल घेऊन औसा येथील हरहुन्नरी तरुण व्यावसायिक महेबुब इमामसाब खडकाले यांची संभाजी ब्रिगेडच्या शहर प्रमुख पदी सर्वानुमते निवड करण्यात  आली.व्यापक रितीने पक्षात काम करण्याची संधी मिळावी तसेच आपल्या माध्यमातून पक्ष अधिकाधिक बळकट करण्याकरीता नरसिंग पवार,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष औसा यांनी नियुक्तिपत्र देऊन महेबुब इमामसाब खडकाले यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळेस संभाजी ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महेबुब इमामसाब खडकाले यांच्या निवडीबद्दल सर्व मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments