*डिजिटल मिडिया कंटेंट डेव्हलपमेंट प्रशिक्षण कार्यक्रमाच्या व्दितीय बॅच चा निरोप सोहळा संपन्न.* 
ओसाड प्रतिनिधी 
दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित स्वाधार अंध-अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र, बुधोडा येथे डिजिटल मिडीया कंटेंट डेव्हलपमेंट या प्रशिक्षण कार्यक्रमाची दुसरी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी मा. श्री. किरण येळणूळकर ( विविधा फिल्म, लातूर ), मा. श्री. जनार्धन खांडेकर ( खांडेकर फोटो स्टुडिओ, लातूर ) व मा. श्री. प्रशांत पिसे ( एकलव्य फोटो स्टुडिओ, कोल्हापूर ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

डिजिटल मिडीया कंटेंट डेव्हलपमेंट हा 4 महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम डिसेंबर 2021 पासून अस्थिव्यंग युवकांसाठी चालवला जात आहे. या प्रशिक्षणामध्ये ग्राफिक्स डिझाईन, व्हिडीओ एडिटिंग व डिजिटल मार्केटिंग चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. अस्थिव्यंग विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल कौशल्य हे तसच न ठेवता त्या घेतलेल्या कौशल्याचे येणाऱ्या जीवनात व्यवसाय वाढी साठी उपयोग करावा असे या वेळी मान्यवरांनी कार्यक्रमात बोलताना सांगीतले. 

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरिश्चंद्र सुडे , कार्यकारी विश्वस्त मा. श्री. प्रशांत सुडे, बालाजी कांबळे, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments