गुळखेडा ग्रामपंचायतचे खा निंबाळकर यांना विविध मागण्यासाठी साकडे
 औसा प्रतिनिधी
 उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची गुलखेडा व गुळखेडा वाडी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विविध मागण्यासाठी त्यांना साकडे घातले आहे. गुळखेडा गुळखेडा वाडी आणि रिंगणी या गुळखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ता विद्युत रोषणाईसाठी विद्युत डीपी गुलखेडा रस्त्यावरील पुलांचे बांधकाम व्यायाम शाळा व सांस्कृतिक सभागृहासाठी गुळखेडा वाडी आणि गुळखेडा गावासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. या शिष्टमंडळामध्ये सर्व श्री बबन चेंडके, भास्कर यादव, महालिंग गिराम, भास्कर भोसले, सुधीर भोसले, पृथ्वीराज गोरे, विठ्ठल पांचाळ ,सुभाष शिरसले, नानासाहेब भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Post a Comment

0 Comments