महावितरणचा रात्रीस खेळ चाले

रात्रीच्या लाईट मुळे नागरिक त्रस्त

औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील बेलकुंड येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गुळखेडा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मागील चार - पाच दिवसांपासून नागरिकांना संपुर्ण रात्र पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. कारण अधिच पावसाळ्यांचे दिवस असल्याने सतत विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यांने नागरिक त्रस्त असताना अचानक बेलकुंड सप्टेशन अंतर्गत येणाऱ्या गुळखेडा,गुळखेडा वाडी ,येल्लोरी,रिंगणी या गावांसाठी बेलकुंड येथील विद्युत अभियंता यांनी लाईट चे थ्री फेज टाईम  वेळ रात्री 9:40 ते सकाळी 5:40 ठेवल्याने बेलकुंड महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीही पसरली आहे. कारण पावसाळा सुरु असल्याने सध्या सर्वत्र लोड कमी असताना ही जाणिव पुर्वक रात्रीची लाईट येण्याची वेळ ठेवली आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रात्रभर भटकंती करावी लागत आहे. रात्री पाणी भरले नाही तर  पिण्याचे पाणी मिळणेही मुश्‍कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. अशा गंभीर मुद्‌द्‌याकडे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मात्र दुर्लक्ष होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सोशल मीडिया वर विद्युत कर्मचारी लाईनमन यांनी टाकलेल्या संदेशाला ट्रोल केले जात आहे. रात्रीच्या लाईट मुळे नागरिक, महिला, वयोवृद्ध यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे महावितरणच्या बेलकुंड येथील अभियंता विरोधात जनतेतुन तीव्र असंतोष निर्माण झाला आहे...

Post a Comment

0 Comments