जामा मस्जिद ते हनुमान मंदिर लातूर वेस पर्यंतचा तिसरा टप्पा रस्ता तात्काळ तातपूरते मजबूत करुन डांबरीकरण करावे: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील बरेच दिवसांपासून रखडलेला तिसरा टप्पा रस्ता अतिशय खराब झाला असून मागील ब-याच दिवसांपासून आम्ही सदर रस्ता करणेबाबत मागणी एमआयएमच्या वतीने करीत आहोत, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही होत नाही.सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे सदर रस्ता हा अत्यंत खराब झालेला आहे.व सदर रस्त्यावर पाणी साचून लोकांना चालणे फिरणे कठीण झाले आहे.मागील कॉन्सीलने मजबुतीकरण करणे संदर्भात ठराव मंजूर केलेला आहे.तरी मुख्याधिकारी यांनी दिवाळीच्या आत सदर रस्ता हा डांबरीकरण करून घेण्यात यावे, अन्यथा एम आय एमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक 19 संप्टेंबर सोमवार रोजी निवेदनाद्वारे दिला आहे.
0 Comments