शिवली व बिरवली येथिल विविध विकास कामांचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी 
 पंचायत समिती औसाच्या मा. उपसभापती तथा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्षा सौ.रेखाताई शिवकुमार नागराळे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या मतदार संघातील मौजे शिवली व बिरवली येथील ३० लक्ष रुपयाच्या पेवर ब्लॉक रस्ता,नाली बांधकाम, पाणीपुरवठाच्या विविध विकास कामाचे उद्घाटन आज ११ सप्टेंबर २०२२ रोजी मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे, शिवली सरपंच सुधाकर खडके, बिरवली सरपंच देवानंद कदम, मनसे तालुका सचिव जीवन जंगाले,ग्रा.प.सदस्य नवनाथ कुंभार, विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य गोपाळ पाटील,रामहरी डिगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवम पाटील,अमोल पाटील,सयाजी पाटील,मारुती शिरसागर,तानाजी गरड,श्रीहरी जाधव,सौदागर कांबळे सर,खंडू जाधव,सुभाष कुंभार,व्यंकट राजवरके,बंकट राजवरके,मोहन पाटील,सूर्यकिरण वाघमारे,व्यंकट आळणे इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments