अँडव्होकेट शिवाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हीड लसीकरण शिबिर संपन्न
औसा प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँडव्होकेट शिवाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित् राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औसाच्या वतीने बुस्टर ढोस सह कोव्हीड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 8 सप्टेंबर गुरुवार रोजी राष्ट्रवादी संपर्क कार्यालय समता नगर औसा येथे बुस्टर ढोस व कोव्हीड लसीकरण शिबिराचा कार्यक्रम 11 ते 4 वाजेपर्यंत घेण्यात आले.या शिबीरामध्ये महिला व नागरिक मिळून 40 जणांनी या कोव्हिड लसीकरणाचा लाभ घेतला. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या लसीकरण शिबिरामध्ये औसा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य सेविका सौ. सुनीता जाधव,सौ. वंदना ढाकणे, भैय्यासाहेब रोंगे, हणमंत देशमुख यांनी परिश्रम घेतले.यानंतर संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रवादी संपर्क कार्यालय समता नगर येथे अँडव्होकेट शिवाजी सावंत यांना शाल व पेठा, पुष्पहार व केक कापून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुलेमान अफसर शेख, माजी नगराध्यक्षा सौ. किर्ती ताई कांबळे,माजी पाणीपुरवठा सभापती गोंवीद जाधव, तालुका कार्याध्यक्ष अविनाश टिके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा वकील इनामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अँडव्होकेट संतोष औटी, बालाजी शिंदे,सेवादलाचे उपाध्यक्ष गजेश्वर शिंदे,शहर उपाध्यक्ष राहुल मलवाड, अँडव्होकेट बेद्रे, बसवराज कोपरे,ए.बी.कांबळे सर पत्रकार एस. ए. काझी, किशोर जाधव, मुख्तार मणियार आदि उपस्थित होते.
0 Comments