संस्कारक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची - आ. अभिमन्यू पवार 


औसा येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न. 

औसा प्रतिनिधी 


औसा - गुणवंत विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.तर शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षक व पालकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे शिक्षकांच्या अडचणीची मला जाणीव आहे. देशात संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयतशील असून मोंदीजीच्या संकल्पनेतील विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची असल्याचे प्रतिपादन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे. 

               सेवा पंधरवडा अंतर्गत ते (दि.२५) सप्टेंबर रोजी औसा येथील विजय मंगल कार्यालयात शिक्षण विभाग पंचायत समिती औसा आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर शिक्षक आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, गटविकास अधिकारी सतीश पाटील, गटशिक्षणाधिकारी  अनुपमा भंडारी,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड, लातूर प्रा. राजेंद्र गिरी, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन महादेव खिचडे, सचिव संजय जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, भाजपचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता,जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवार, पंचायत समिती सदस्य दिपक चाबुकस्वार,पंचायत समिती सदस्य रेखा नागराळे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन आनसरवाडे आदी उपस्थित होते. यावेळी आ. अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील बाला उपक्रमामुळे प्रत्येकांना शाळा आपली वाटत आहे. या उपक्रमासाठी मी २५ लाखांचा निधी दिला असून यापुढेही अपेक्षित सहकार्य केले जाईल.मराठवाडा भारतात उशिरा विलीन झाला आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. हि इतिहास अभ्यासक्रम यावा यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी आ. अभिमन्यू पवार, आ. विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 

                     गत तीन वर्षांपासून रखडलेल्या या शिक्षक पुरस्कार वितरणासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे तीन वर्षांपासून रखडलेला हा आदर्श शिक्षक वितरण सोहळा संपन्न झाला. यामध्ये ८७ शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. 

पुरस्कारप्राप्त शिक्षकांची जबाबदारी वाढली - आ. विक्रम काळे 


पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे. सर्वच शिक्षक चांगले काम करीत असतात. त्यामध्ये शाळेला अधिक वेळ देऊन शाळेची गुणवत्ता वाढवून विद्यार्थीप्रती आस्था असते आशा शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. शिक्षकांच्या विश्वासार्हातामुळे जिल्ह्यात ५ कोटींचा लोकवाटा जमा झाला आहे.याचबरोबर जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा स्तर वाढला असल्याचे यावेळी बोलताना आ. विक्रम काळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments