शहिद वीर जवान सुरेश चित्ते  यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व वृक्षारोपण  कार्यक्रम 

औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील आलमला येथील श्री सार्वजनिक गणेश मंडळ, आलमला, माऊली ब्लड बँक लातुर,  व वसुंधरा प्रतिष्टान  लातूर,   यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले होते.त्या अनुषंगाने आलमला येथे  दिनांक 4 सप्टेंबर,  रविवार   रोजी रक्तदान शिबिर व वार्क्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला.  या शिबिरात एकूण  41 रक्तदात्याने रक्तदान केले. या  कार्यक्रमाचे उद्घाटन  वसुंधरा प्रतिष्ठान लातुर अध्यक्ष श्री.योगेश शर्मा सर  यांच्या हस्ते करण्यात  आले. या कार्यक्रमास  धनंजय निलंगेकर,  मंडळाचे संथापक अध्यक्ष, अँडव्होकेट अमोल निलंगेकर , जनपथ शिक्षण संस्था, लातूर चे सचिव  अँडव्होकेट संगमेश्वर पाटील, शालेय समिती अध्यक्ष  शिवकुमार पाटील, तावरजा पथसंस्थेचे व्हॉइस चेअरमन  कपिल धाराशिवे, श्री रामनाथ शिक्षण संस्थेचे संचालक कैलास कापसे, मंडळाचे माजी अध्यक्ष विवेक निलंगेकर, अँडव्होकेट संदिप पाटील, रवि कदम, शिवलिंग मामडे, माउली लोणारे यांनी भेटी दिल्या. या  मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, ऊपाध्यक्ष अर्जुन कळबडे, कोषाध्यक्ष रितेश निलंगेकर, सचिव मोहन गिरी,  प्रभाकर जाधव,योगेश खिचडे, बाळू कुंभार, मन्मथ स्वामी  सर्व मंडळाचे सदस्य व त्याच्या मित्रमंडळींनी खूप परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments