अलिशा बागवान यांचे वक्तृत्व स्पर्धेत उज्वल यश
औसा प्रतिनिधी
आजादी का अमृत महोत्सव आणि मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आझाद उर्दू प्राथमिक शाळा किल्लारी येथील इयत्ता आठवी वर्गातील विद्यार्थिनी अलिशा खाजा बागवान या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून 1 हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र प्राप्त केले आहे. अलिशा बागवान या विद्यार्थिनीस मुख्याध्यापक शेख मारूफ , नासिर खान तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीच्या या उज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रशीद सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments