लंपी स्किन बाबत पशुपालक शेतकऱ्यांनी जागृत रहावे- डॉ. दीपक मुळे
औसा प्रतिनिधी
लंबी स्कीन नावाचा साथीचा रोग सध्या जनावरांमध्ये सुरू असून पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी हा रोग म्हशी सारख्या प्राण्यास अत्यंत कमी प्रमाणात आढळून येत असून गाई आणि वासरामध्ये या रोगाचे प्रमाण दिसून येत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जनावरांचे गोठ्याची फवारणी करून घ्यावी, तसेच हा रोग डास, गोमाशी, गोचीड इत्यादी पासून दुसऱ्या प्राण्यांमध्ये पसरत असल्याने डास गोमाश्या आणि गोचीड यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना औसा येथे मोफत औषधोपचार शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. आपल्या जनावरास गाठी आढळून येत असतील तर शेतकऱ्यांनी तातडीने आपली जनावरे लसीकरण करून घ्यावी किंवा पशुवैद्यकीय दवाखाना औसा येथे उपचारासाठी घेऊन यावीत. आपल्या पशुधनाचे गोठे स्वच्छ ठेवावेत तसेच ज्या ठिकाणी पशुधनाचा निवारा आहे अशा ठिकाणी औषधाची फवारणी करून घ्यावी. व आपल्या पशुधनाची जोपासना करावी असे आवाहन डॉ. दीपक मुळे पशुवैद्यकीय अधिकारी औसा यांनी केले आहे.
0 Comments