माजी सैनिक ससाणे परिवाराच्यावतीने एकता मंडल गणेश मंडळ येथे "श्री" ची आरती
औसा शहरातील करीमनगर येथील एकता गणेश मंडल येथे आज माजी सैनिक भीमाशंकर ससाणे याच्या परिवाराच्या हस्ते श्री" ची आरती करण्यात आले. एकता गणेश मंडळाच्या दररोज एक परिवार असा आरतीचा उपक्रम असून आज माजी सैनिक ससाने यांच्या परिवाराने "श्री" ची आरती केली. गणपती हा विघ्नहर्ता असून सर्व विघ्न दूर करते अशी श्रद्धा गणेश भक्तामध्ये असते आणि आज शेतकऱ्यावर जे विघ्न आहेत ते दूर व्हावे पाऊस चांगला पडू दे सुख-समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना माझी सैनिक भीमाशंकर ससाने यांच्या परिवाराच्या वतीने करण्यात आली. एकता गणेश मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रोज राबविण्यात येत असून नऊ दिवस नवनवीन उपक्रम या मंडळाच्या वतीने घेण्यात येत आहे. या वेळी अमोल विलास पांचाळ, अजय पांढरे, अनिल चव्हाण,
भीमाशंकर निवृत्ती ससाने, गोटू राठोड, जीवन चव्हाण, रुक्मिण भीमाशंकर ससाने,
रेखा पांढरे, कालींदा साळुंखे, वंदना पांचाळ, सुनिता पांचाळ, सह महिला, पुरुष, पूर्ण गणेश मंडळ, अदि गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments