*बनावट कागदपत्रा आधारे शासकीय गायरान जमिनीवर अनाधिकृत मोबाईल टावर केले उभे!
ग्रामसेवक व सरपंचावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने केली मागणी.
औसा प्रतिनिधी
मौजे शिवली तालुका औसा येथे महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करून ज्या ठिकाणी लोक राहतात त्याच वस्तीत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने अधिकार नसताना ग्रामपंचायत नमुना नंबर 8 अ तयार करून गावातील एका व्यक्तीच्या नावावर बेकायदेशीर ती जागा करून जिओ कंपनीचे मोबाईल टावर उभा करून शासनाची फसवणूक केली आहे. दि.23/02/2022 रोजी जिओ मोबाईल टॉवर कंपनी बद्दल माहिती अधिकारात ग्रामपंचायत शिवली येथे माहिती मागितली असता अद्याप माहिती दिली नाही तसेच प्रथम अपील अधिकारी यांचे आदेश आहे की, अर्जदार यांनी मागितलेली त्यांना दहा दिवसाच्या आत मोफत माहिती देण्याचे आदेश असताना सुद्धा ग्रामसेवक श्री.बनसोडे यांनी अद्याप माहिती दिली नाही. माहिती न देण्याचे कारण कि जे मोबाईल टावर उभा केले आहे त्यासाठी ज्या ज्या परवानग्या लागतात पोलीस, प्रदूषण विभाग, आरोग्य विभाग, फायर सेफ्टी विभाग व इतर कोणतीच परवानगी घेतलेली नाही अशी शक्यता नाकारता येत नाही सदर भ्रष्टाचार उघड होतो या भीतीपोटी अद्याप माहिती दिली नाही. वास्तविक पाहता सदरील जागेचा भाडा ग्रामपंचायत अथवा शासनाला मिळणे अपेक्षित आहे परंतु सरपंच व ग्रामसेवकांच्या गलथन कारभारामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सदरील गावात पाच वर्षांपूर्वी बेघर लाभार्थ्यांना 98 घरकुल मंजूर झाले होते परंतु त्या लाभार्थ्यांना शासकीय गायरान जागेत घरे बांधण्यास ग्रामपंचायत ने परवानगी दिली नाही मग त्याच जागेचा बनावट नमुना नंबर आठ अ गावातील एका व्यक्तीच्या नावे तयार करून जिओ कंपनीला मोबाईल टावर उभा करण्यासाठी परवानगी देण्यामागे काहीतरी दडलय! सदरील शासकीय जमिनीवर जिओ कंपनीचे मोबाईल टावर बांधकाम करण्यास परवानगी देणाऱ्या व खोटे नमुना नंबर आठ तयार करणाऱ्या सदर व्यक्ती व सरपंच व ग्रामसेवकावर तात्काळ गुन्हा दाखल करावे अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना दिली आहे व सदरील तक्रारीची दखल तात्काळ नाही घेतल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी निवेदनाद्वारे केली तक्रार.
0 Comments