सेवा पंधरवडा निमित्त औसा येथे विविध प्रमाणपत्राचे वितरण... 

औसा/ प्रतिनिधी 
 केंद्र शासनाच्या निर्णयानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर हा कालावधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा असे संबोधन देऊन सर्व जनतेला विना विलंब शासकीय सेवा देण्याचा संकल्प तहसील कार्यालय औसा व महसूल विभागाने केला आहे. या निमित्त औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार, लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी, उपविभागीय अधिकारी श्रीमती शोभा जाधव आणि अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी या मान्यवरांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयामध्ये दाखल केलेल्या विविध प्रमाणपत्राचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले. यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शेतकऱ्यांसाठी फेरफार नकला व सर्वसामान्य जनतेसाठी रेशन कार्ड यासह विविध शासकीय प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा या उपक्रमात नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून औसा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाने या राबविलेल्या उपक्रमाचे जनतेतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments