जीवनविद्या मिशनच्या भजन गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

 जीवनविद्या मिशनच्या भजन गायनाने श्रोते मंत्रमुग्ध


 औसा प्रतिनिधी

  सौ. रुक्‍मीनबाई किशनराव फुलमाळी यांच्या सहामासे कार्यक्रमानिमित्त जीवनविद्या मिशन श्री वामनराव पै हरिपाठ व भजनी मंडळ कळंबोली नवी मुंबई यांच्या वतीने रूक्‍मीनबाई फुलमाळी यांच्या स्मृतीस उजाळा देण्यासाठी आयोजित भजन गायन कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. नील संकुल फंक्शन हॉल कळंबोली येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील शेकडो भाविक व महिला यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संयोजक किशनराव फुलमाळी गुरुजी, संजीव फुलमाळी, राजीव फुलमाळी ,व सत्यवान  फुलमाळी बाबुराव देशमुख ननणंदकर यांनी परिसरातील नागरिकांना उत्कृष्ट भजन गायनाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जिवनविद्या मिशन चे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments