औसा येथे वरिष्ठ स्तर न्यायालय मंजुरीचा विधीज्ञ मंडळात आनंदोत्सव 
औसा प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करून औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा येथे वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी मिळवून घेतली आहे. पदभरतीसह वरिष्ठ स्तर न्यायालयास मंजुरी मिळाल्यामुळे औसा तालुक्यातील न्यायालयीन प्रकरणाचा निपटारा लवकर होणार असून या निर्णयामुळे प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली लागणार असून न्यायालय कामकाजास गती येणार असल्याने असा विधीज्ञ मंडळांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या अभिनंदनचा ठराव घेऊन न्यायालयात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी भाजपाविधी आघाडीचे मुक्तेश्वर वाघदरे, ज्येष्ठ नेते ऍड अरविंद कुलकर्णी, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष विनोद महाजन, उपाध्यक्ष भाऊसाहेब सगट, सचिव  सतीश पाटील, ऍड श्रीधर जाधव, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील उटगे, शेख फहीम, ऍड सतीश माडजे, अँड गजानन कुसुमकर, यांच्यासह विद्युतज्ञ मंडळाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments