*जिल्हा बँक प्रशस्त इमारतीत अत्याधुनिक सेवा देणार*

*मातोळा सोसायटीच्या वतीने आयोजित जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न*

मातोळा दि. ५.

जिल्ह्यातील शेतकरी सभासद याना जिल्हा बँकेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या योजनेतून माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील लोकांना आर्थिक मदत झाल्याने या भागाचा कायापालट झाला असून मारुती महाराज साखर कारखान्यामुळे हा सुजलाम सुफलाम झाल्याचे सांगून लवकरच नूतन प्रशस्त इमारतीत लातूर जिल्हा बँक ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देणार असल्याचे बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे यांनी सांगितले ते औसा तालुक्यातील मा तोला येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या वतीने जिल्हा बँकेच्या नूतन प्रशस्त इमारतीचे पूजन सोमवारी करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव भोसले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, जेष्ठ संचालक अँड श्रीपतराव काकडे, संचालक पृथ्वीराज शिरसाठ संचालक राजकुमार पाटील संचालक अनुप शेळके, जिल्हा बँकेचे कार्यकारी  संचालक हणमंत जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे, उपाध्यक्ष शामराव भोसले , औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, मारुती महाराज साखर कारखान्याचे संचालक सचिन पाटील  उपस्थित होते

*मारुती महाराज साखर कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता आली*

यावेळी बोलताना अँड श्रीपतराव काकडे म्हणाले की या भागातील  सात वर्षांपासून बंद असलेल्या मारुती महाराज साखर कारखाना  माजी मंत्री दिलीपराव देशमुख माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतल्याने हा कारखाना सुरु झाला मागचा गाळप हंगाम यशस्वी झाला असून यावर्षी चालू हंगामात उसाचे गाळप जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत गाळप क्षमता वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी नूतन इमारत बांधण्यासाठी बँक आपल्या स्तरावर पुर्ण सहकार्य करेल असे सांगीतले कार्यक्रमास मा तोळा येथील सरपंच बालाजी सूर्यवंशी, मा तोळा सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर भोसले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सोसायटीचे व्हॉईस चेअरमन गणेश भोसले, माणिकराव मोरे, धनंजय भोसले, बाबासाहेब दार फळकर, प्रदीप भोसले, रामचंद्र भोसले, भुरे गुरुजी, शिवाजी भोसले गुरुजी, दिंगंबर गुरूजी भोसले, किसन गोरे, बबन आनंद गावकर, नंदकुमार भोसले, रवी भोसले, विक्रम भोसले, गजेंद्र माळी, मुकुंद भोसले, नेताजी भोसले, दत्तू सूर्यवंशी, विक्रम भोसले, राम गायकवाड, बँकेचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी इंजिनियर अनंत गाडे, मातोळा  जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक पीचे, जनार्दन साळवे, इन्स्पेक्टर, गटसचिव मदने, हिप्परगा सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव पाटील, लोहटा चेअरमन लिंबरा ज चव्हाण कवळी चेअरमन नीळकंठ जगताप, ग्रामस्थ, सभासद उपस्थित होते 
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत भोसले यांनी मांडले..

Post a Comment

0 Comments