मुक्ता परिवाराच्या वतीने पांडुरंग मूकबधिर विद्यालयात फळे खेळणी वाटप 
औसा प्रतिनिधी
 औसा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोषप्पा मुक्ता यांच्या वाढदिवसानिमित्त येथील पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मुक्ता परिवाराच्या वतीने फळे आणि खेळणी वाटप करण्यात आली. मुक्ता परिवाराला सामाजिक कार्याचा वारसा लाभला असून त्यांच्या परिवारातील कोणाचाही वाढदिवस असो मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षकासोबत सामाजिक उपक्रम राबवून आपला मुक्ता परिवार वाढदिवस साजरा करतो. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेश सुभाषप्पा मुक्ता यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments