अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी पत्रकार राम कांबळे यांना आरतीचा मान 
औसा प्रतिनिधी
 औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची स्थापना केली असून गणेशोत्सव कालावधीमध्ये समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आरतीसाठी आमंत्रण दिले आहे. शनिवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी औसा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राम कांबळे यांच्या कुटुंबीयांना हा आरतीचा मान आमदार महोदयांनी दिला. निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते आरती झाल्यानंतर प्रसाद वितरित करून आमदार अभिमन्यू पवार यांचे वडील दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते राम कांबळे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन कुटुंबीय समवेत सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे, संघटक नारायण सोळुंके, डॉ अनिल जगताप, आत्माराम मिरकले, अतुल पाटील, श्रीकांत स्वामी, माजी नगरसेविका सौ प्रमिला कांबळे, राहुल कांबळे, राजकिरण कांबळे, प्रतिक्षा कांबळे, सौ मनीषा कांबळे, ची अबीर यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. आमदार महोदय यांच्या सर्व घटका तील मान्यवरांना निमंत्रित करून आरतीचा मान देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments