अंगणवाडी कार्यकर्त्यांचे विविध मागण्याचे आमदारांना निवेदन
 औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांच्या अनेक मागण्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत. या मागण्या साठी शासन स्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी राजमाता जिजाऊ महिला बचत गट संघटनेच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अंगणवाडी मध्ये पोषण आहार नियमित व सकस दर्जेदार पद्धतीने देण्यात येतो त्यामुळे पोषण आहाराच्या देयकाचे बिल 8  रुपयावरून 20  रुपये करावे याबाबत वाढत्या महागाईचा विचार करावा. आहार शिजवणाऱ्या महिलांना कायम करावे सेविका मदतनीस यांना लागू असणाऱ्या सर्व सुविधा तात्काळ देण्यात याव्या. पोषण आहारातील मेनू स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असणारा असावा बचत गटात दरमहा रेशन दुकानातून गहू, तांदूळ पुरविण्यात यावे. पोषण आहाराची देखे प्रत्येक महिन्याला विना विलंब अदा करावी खाऊ शिजविणाऱ्या महिलांना दरवर्षी ठरावाची अट रद्द करावी. यासह इतर मागण्याचे निवेदन आमदार अभिमन्यू पवार यांना संघटनेच्या शिष्टमंडळाने दिले आहे. या निवेदनावर संघटनेच्या अध्यक्षा सौ उषा भोजने, उपाध्यक्ष शशिकला अंभोरे ,आणि सचिव सुनिता सूर्यवंशी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments