अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या उपोषणकर्त्यास न्याय देण्याची मागणी
औसा प्रतिनिधी
पूर्णा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध विकास कामाची चौकशी करावी तसेच एक कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकाम कामासाठी लागणारा खर्च कंत्राटदाराचे नाव व इतर आवश्यक बाबीसह अंदाजपत्रक नमूद करून नाम फलक लावावे. या मागणीसाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मारुती ढाले हे नगरपरिषद पूर्णा येथील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. उपोषणाचा 7 दिवस सुरू असताना या उपोषणकर्त्यास कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही. तसेच कामाची चौकशी होत नसल्यामुळे सदर उपोषणकर्त्याच्या मागणीप्रमाणे उपोषण कर्त्याची दखल घेऊन मारुती ढाले यांना न्याय द्यावा. अशी मागणी औसा येथील पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. या नियोजनावर सर्वश्री शिवाजी मोरे, उमेश बनसोडे, हरिभाऊ कुलकर्णी, वामन अंकुश, अशोक देशमाने यांच्या सह्या आहेत.
0 Comments