औसा शहरातील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे फक्त गुऱ्हाळ सुरू 
औसा (प्रतिनिधी)दि.१०
औसा  नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दोन टप्प्यांमध्ये मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले. परंतु लातूरवेस हनुमान मंदिर ते जामा मस्जिद पर्यंतच्या तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे काम मागील अनेक दिवसापासून अनेक कारणाने रखडले आहे. माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम त्वरित मार्गी लावू असे सांगत रस्त्याचे भूमिपूजन ही केले होते परंतु अद्याप शहरातील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडल्याने शहरातील व्यापारी नागरिकांना अतोनात गैरसोय सहन करावी लागत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ही मोठ्या प्रमाणात औसा शहराला निधी प्राप्त झाला परंतु शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आले आहे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करून या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे असे मागणी केली होती. परंतु त्यांनाही अद्याप यश आलेले नाही आमदार अभिमन्यू पवार यांनीही याबाबत पाठपुरावा करून तिसऱ्या टप्प्याचा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.अशी माहिती शहरातील नागरिकांना दिली वास्तविक पाहता तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाचे काम अत्यंत महत्त्वाचे व प्राधान्याने करणे गरजेचे असताना या कामाकडे सर्वच राजकीय पक्षाचे नेते गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्यामुळे व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या रस्त्यावरून वाहने चालवता येत नाही पायी चालणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरून चालता सुद्धा येत नाही. पायी जाणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखल व पाण्याचे शिंतोडे उडत असून या रस्त्यावरून वृद्ध नागरिक महिला व विद्यार्थी यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या रस्त्या रुंदीकरणाच्या कामाबाबत आम्ही सकारात्मक भूमिका घेत आहोत अशा वर्तमानपत्रातून फक्त बातम्या छापल्या परंतु हे काम आस्थागायत रखडले असून शहरातील तिसऱ्या टप्प्याच्या रस्ता रुंदीकरणाचे केवळ गुराळच सुरू आहे. माझी लोकनियुक्त नगराध्यक्षांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी या रस्त्याचे काम अद्याप न झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तिसरा टप्पा रस्ता रुंदीकरणाच्या बाबत राजकीय मतभेद बाजूला सारून हा रस्ता तातडीने मार्गी लावावा अशी शहरातील नागरिका मध्ये चर्चा सुरू आहे.

Post a Comment

1 Comments