सामाजिक राजकीय क्षेत्रातील उगवता तारा संतोषप्पा मुक्ता-
संतोषप्पा सुभाषप्पा मुक्ता यांच्या कुटुंबाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राचा सुरुवातीपासूनच वारसा आहे. त्यांचे वडील सुभाषप्पा मुक्ता हे वीरशैव समाजाचे अध्यक्ष म्हणून मागील अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. वीरशैव गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून सुभाषप्पा मुक्ता यांनी सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत संतोषप्पा मुक्ता यांनी औसा शहर आणि तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी समाज कार्याला सुरुवात केली. आपल्या कुटुंबाचा वारसा चालवत त्यांनी औसा शहर आणि तालुक्यामधील युवकांना प्रेरित करून तरुण वर्गाचे मोठे संघटन बांधणी केली आहे.गोरगरीब विद्यार्थी व नागरिकांना मदत करणे तसेच प्रत्येकाच्या कार्यात व सुखदुःखात सहभागी होऊन सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा पिंड आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून आज त्यांचे नाव संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वश्रुत आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांचे ते खंदे समर्थक असून त्यांच्या पक्षनिष्ठेमुळे आणि पक्षातील त्यांच्या सहभागामुळे आज त्यांना लातूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता सतत समाजकार्य व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा हीरीरीने सहभाग असतो. आमदार अभिमन्यू पवार यांच्या संपर्कात राहून त्यांनी औसा शहरातील विविध प्रभागांमध्ये सिमेंट रस्ते, नाली, बांधकाम, तसेच स्मशानभूमी चे संरक्षक भिंत व स्मशानभूमी शेड बांधणी अशी विविध विकासाची कामे केली. शेत रस्ते व शिवरस्त्याचे जनक आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी अत्यंत आवश्यक असणारे शेत रस्ते तयार करण्यासाठी शेतकरी वर्गाला विश्वासात घेऊन शेकडो किलोमीटरचे शेत रस्ते आज रहदारीसाठी तयार झाले आहेत. या शेत रस्त्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते 4 जून 2022 रोजी झाले. औसा तालुक्यातील हासेगाव जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी विविध विकासाच्या कामामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्यामुळे आज त्यांच्याकडे तरुण वर्ग आकर्षिला जात आहे. वाढदिवसानिमित्त शेकडो वृक्षांची लागवड, सेवालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश, मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश व स्नेहभोजन, रुग्णांना फळे वाटप अशा विविध सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी आपले वाढदिवस साजरे केले आहेत. आपले दातृत्व आणि वक्तृत्वाच्या बळावर आज त्यांचे समाजाभिमुख नेतृत्व तयार झाल्यामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रातील उगवता तारा म्हणून संतोषप्पा मुक्ता यांची ओळख निर्माण झाली आहे. संतोषप्पा मुक्ता यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभकामना
शब्दांकन ....
राम कांबळे औसा
0 Comments