रामनाथ गणेश मंडळाच्या वतीने हॅपी थेरपी मोफत शिबिर संपन्न

औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील आलमला येथील रामनाथ नगर येथील श्री रामनाथ गणेश मंडळ व हॅप्पी मेडिकेअरच्या वतीने दिनांक 7 सप्टेंबर 2022 बुधवार रोजी सकाळी 9 वाजता  शहीद वीर जवान  सुरेश चित्ते यांच्या स्मरणार्थ  आरोग्य शिबीर  संपन्न झाले.आजची आरती  संतोष सोमवंशी उपसभापती महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघ पुणे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शहीद जवान सुरेश चित्ते यांच्या प्रतिमेचे पूजन केले.नंतर सर्व लोकांना हॅपी थेरपी चे महत्व लातूर विभागाचे प्रमुख योगेश पाटील यांनी सांगितले . दोन्ही मान्यवरांचा गणेश मंडळातर्फे शाल पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.

 या आरोग्य शिबिरात हॅप्पी मेडीकेअर थेरपी चा एकूण 251 लोकांना फायदा झाला. या प्रसंगी  दिनेश जावळे जिल्हाप्रमुख युवासेना, श्री महादेव खिचडे चेअरमन औसा तालुका शिक्षक पतसंस्था, लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष  श्री  महादेव कुंभार, महाराष्ट्र राज्यí जेष्ठ नागरिक संघाचे मराठवाडा सचिव  प्रभाकर कापसे, धानोराचे सरपंच मुसळे,विकास सुर्यवंशी, यश विहिरे, अर्पिता कोरडे, भाजप युवा उपाध्यक्ष कमलेश निलंगेकर, तंटामुक्ती अध्यक्ष विरभद्र बेरुळे, पी. सी. पाटील, कपिल धाराशिवे, शंकर धाराशिवे, उद्धव जडगे, दिलिप पाटील, हामू कदम, शिवप्रसाद आंबुलगे व आलमल्याचे ग्रामस्त उपस्थीत होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रामनाथ गणेश मंडळाचे अध्यक्ष  कैलास कापसे, सचिव अप्पासाहेब आडसुळे, आबासाहेब लांडगे, खंडू मस्के, दत्ता राऊत, प्रविण जगदाळे, महादेव मगर,  अण्णासाहेब गायकवाड, खादर वडवळे,  चरणसिंग ठाकूर, भाई ठाकूर, राजु गुंजोटिकर, महेश पाटील व त्याच्या मित्रमंडळींनी खूप परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments