औशात सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत हर्ष उल्हासामध्ये साजरा


बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत औसा शहरात तरुणाईच्या आनंदाला उधाण 
औसा प्रतिनिधी
 दिनांक 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत हर्ष उल्हासामध्ये औसा शहर व तालुक्यात साजरा करण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक गणेश उत्सवावरील सर्व निर्बंध हटविल्यामुळे आणि मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या संकटामुळे गणेश भक्ताच्या आनंदावर विर्जन पडले होते यावर्षी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गणेश भक्ताच्या आनंदाला उधाण आले होते.
 शहरातील मानाचा गणपती वीरशैव गणेश मंडळांनी दुपारी तीन वाजता तहसीलदार भरत सूर्यवंशी,उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी,वीर सेवा समाजाचे अध्यक्ष सुभाष मुक्ता, गणेश मंडळाचे अध्यक्ष गिरीश    इळेकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरती करून श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ केला. वीरशैव गणेश मंडळाने कोणत्याही प्रकारच्या ध्वनिक्षेपकाचा वापर न करता सोलापूर येथील विराट लेझीम पथकाच्या नृत्य आविष्कारामध्ये अत्यंत शांततेमध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
बाल गणेश मंडळ, रॉक गणेश मंडळ ,वीरशैव कक्कया गणेश मंडळ ,धर्मवीर संभाजी गणेश मंडळ, मराठा गणेश मंडळ ,हनुमान गणेश मंडळ, आजोबा गणेश मंडळ ,आझाद गणेश मंडळ, नरसिंह गणेश मंडळ, शिव गणेश मंडळ नाथ नगर आदी प्रमुख मंडळासह अनेक गणेश मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीमध्ये अत्यंत हर्ष उल्हासामध्ये लेझीम खंजिरी ढोल ताशा झेंडा पथक इत्यादीच्या साह्याने देशभक्तीपर व वेगवेगळ्या गीताच्या तालावर उत्कृष्ट नृत्य आविष्कार करून दाखविला.
 रॉक गणेश मंडळाच्या वतीने देशभक्तीपर पथनाट्य सादर करून गणेश भक्ताचे मंडळाचे लक्ष वेधले कक्कया गणेश मंडळाच्या वतीने वारकरी दिंडी च्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 बहुतांश गणेश मंडळांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व नैसर्गिक फुलांची सजावट करून श्री गणेश मूर्तीची मिरवणूक शहरातून काढली होती. शहरातील हिंदू मुस्लिम बांधव मिरवणुकीत सहभागी होऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे गणेश भक्तांनी दर्शन घडविले,येथील नवयुवक मित्र मंडळाच्या वतीने गणेश भक्तासाठी अल्पोपहार म्हणून खिचडीची व्यवस्था केली होती. अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक महासंघ व शिवशक्ती सामाजिक संघटना तसेच भारतीय जनता पार्टीचे गटनेते सुनील उदगीर यांच्या वतीने गांधी चौक येथे गणेश मंडळाचे आगमन होतच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तर औसा नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे स्वागत स्टेज उभारून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला निलंगा वेस्ट नजीक असलेल्या आझाद चौक येथे मुस्लिम बांधवांनी सर्व गणेश भक्तासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून मानवतेचे दर्शन घडविले. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीमध्ये तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते.विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेश मंडळाच्या कलावंतांनी लक्ष वेधून घेतले बालकलावंतांनी सुद्धा उत्कृष्ट नृत्याविष्कार करून असा शहरातील गणेश भक्ताच्या आनंदात भर टाकली विसर्जन मिरवणुकीत शांततेत पार पडावी म्हणून तहसीलदार भरत सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर पवार पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता पोलीस प्रशासनाला शांतता समितीच्या शहरातील सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments