औसा प्रतिनिधी
औसा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली समतानगर व बिलाल नगर येथील नागरिकाच्या सोयी करीता ज्या नागरिकांनी पहिला- दुसरा-व बुस्टर डोस घेतलेला नाही त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे. असे प्रभाग क्रमांक 3 मधील माजी नगरसेविका सौ. किर्ती ताई कांबळे यांच्या निवासस्थानी शिबिराचे आयोजन केले होते. माझा प्रभाग - माझं शहर - माझी जबाबदारी या अनुषंगाने आज दिनांक 15 संप्टेंबर 2022 गुरुवार रोजी कोव्हीड लसिकरण शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये 32 नागरिकांनी लस व बुस्टर डोस घेऊन आपला सहभाग नोंदविला.या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.या लसिकरण शिबिरामध्ये माजी नगराध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड.शिवाजी सावंत, गजानन शिंदे आदिनी भेट देऊन सहभाग नोंदविला.या शिबिरात औसा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ अतुल कांबळे, अभिजीत क्षीरसागर, आरोग्य सेविका सौ.सुनीता जाधव यांनी लसिकरणाचे योगदान देऊन लसिकरणापासून कोणत्याही नागरिकांनी व़चित राहू नये असे आवाहन देखील औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले.
0 Comments