विश्वनाथ नागरी पतसंस्था होतकरू व्यवसायिकांच्या पाठीशी: किरण उटगे
 औसा प्रतिनिधी 
विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून औसा शहर व तालुक्यातील सुमारे 2500 सभासदांचा विश्वासाच्या बळावर आर्थिक प्रगतीची वाटचाल करीत आहे. सभासद आणि ठेवीदारांच्या विश्वासाने विश्वनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होत असून औसा शहर व तालुक्यातील लहान  व्यवसायिकांना अल्प व्याजदरामध्ये अर्थसाह्य करीत आहे. या माध्यमातून व्यवसायिकांना आपल्या व्यवसायासह कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला सहकार्य होणार आहे असे प्रतिपादन चेअरमन किरण राज शेखर अप्पा उटगे यांनी केले. श्री मुक्तेश्वर मंगल कार्यालय औसा येथे आयोजित संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी हजारो समस्त कर्जदार व ठेवीदार उपस्थित होते. या प्रसंगी उत्कृष्ट ठेवीदार नियमित कर्जफेड करणारे कर्जदार पिग्मी एजंट व पतसंस्थेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे सभासद व ठेवीदार यांच्या विश्वासाला कोणत्याही परिस्थितीत तडा जाऊ दिला जाणार नाही विश्वासाला पात्र होऊन पतसंस्था कार्य करेल असा विश्वास यावेळी किरण उटगे यांनी सर्वसाधारण सभेला संबोधित करताना व्यक्त केला. यावेळी सर्वश्री अभिजीत उटगे, महेश पाटील, कंटाप्पा मुळे, व्यंकट मोरे, संदिपान जाधव, सुशील कुमार बाजपाई, गणेश कोळपाक, भागवत कांबळे, माधव सिंह परिहार, हनुमंत थोरात, नागनाथ निगुडगे, बब्रुवान गाडेकर, आदी मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती, यावेळी ॲड मुक्तेश्वर वाघदरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत बनसोडे नाना यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संतोष शेटे यांनी केले. तर डॉ स्वप्निल कल्याणी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments