तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आज औसा येथे आयोजन
 औसा प्रतिनिधी
 पंचायत समिती औसा आणि गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता विजय मंगल कार्यालय औसा येथे करण्यात आले आहे प्रमुख अतिथी म्हणून खा ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि खा सुधाकर शृंगारे, अभिमन्यू पवार, शिक्षक आमदार विक्रम काळे व धीरज देशमुख आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, तसेच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षण अधिकारी तृप्ती अंधारे, भगवान फुलारी, आणि विशाल दुषवंत इत्यादी मान्यवर या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास शिक्षण प्रेमी जनतेने व निमंत्रित आणि उपस्थित रहावे असे आवाहन गटशिक्षण अधिकारी सतीश पाटील आणि गट शिक्षण अधिकारी अनुपमा भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments