मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौऱ्याने
 भादा गावात विकास क्रांतीचे पर्व

औसा -तालुक्यातील भादा येथे नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद लातूर यांचा दौरा "सही पोषण,देश रोशन" या एकात्मिक बाल विकास विभाग यांच्या
कार्यक्रमानिमित्त आज दिं 23 सप्टेंबर रोजी असल्याने भादा गावामध्ये अनेक विकास कामे जोरदार सुरू वात करून कामे पूर्ण केली आहेत. यामुळे गावात एक "विकास क्रांतीच पर्व,
गाव नंदनवन दिसतय सर्व" अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र भादा गावामध्ये दिसून येत आहे.
 मागील काही दिवसापासून भादा तालुका औसा येथे बिहार पॅटर्न अंतर्गत पाच ते सहा हजार ही नारळाची वृक्ष लागवड करण्यात आली असून हे फळ झाडाची वृक्ष लागवड संगोपन करण्यासाठी या वृक्षांना पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे याकरिता मोठे आळे बनविले जात असून त्या वृक्षाची जोपासना होणे आवश्यक असल्याने या प्रत्येक नारळ या फळझाडास संरक्षणात्मक जाळी उपलब्ध करण्यात येऊन ते रहदारीच्या ठिकाणी असणाऱ्या बहुतांश झाडांना जाळीचे संरक्षण बसविले जात आहे आणि गावामध्येच पाणी मुरले जावे याकरिता आनंदनगर- चिरकाड या भागात ,"रेन हार्वेस्टिंग"चे काम दोन ठिकाणी प्रगतीपथावर असल्याचे चित्र भादा गावांमध्ये दिसून येत आहे. तसेच भादा गावामध्ये नवीन वस्ती आणि खराब रस्ते अशा ठिकाणी रस्ते मजबुतीकरणाचे काम पंचायत समिती माध्यमातून ग्रामपंचायतीने हाती घेऊन नागरिकांना व्यवस्थित रहदारी निर्माण व्हावी याकरिता रस्ते मजबतीकरण करण्यात आले आहे. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी भादा गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
या वृक्षांमध्ये अशोक,बोधी वृक्ष,वड, चिंच, आंबा, आवळा, करंज ,कडूनिंब ,नारळ  आदीं व्रक्षासह काही नवीन जंगली व्हरायटीची वृक्ष गावच्या चहूबाजूंनी लागवड करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
 तर या वृक्षाचे संगोपन व्यवस्थितपणे करण्यासाठी गटविकास अधिकारी सतीश पाटील,विस्तार अधिकारी बालाजी पोतदार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुर्यकात बारबोले,तांत्रिक अधिकारी चव्हाण, भादा ग्रामपंचायत कडून ग्राम विकास अधिकारी माणिक व्हि सूर्यवंशी,उपसरपंच बालाजी एम शिंदे,अमोल आर पाटील,सूर्यकांत ए उबाळे आणि इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून गावातील विकास कामाबाबत सहकार्य लाभत असल्याने व्यापक अशा योजना राबविल्या जात असल्याची चर्चा सध्या गावांमध्ये आहे.

Post a Comment

0 Comments