*औसा तालुका शिवसेना प्रमुखपदी गणेश माडजे यांची निवड
औसा प्रतिनिधी
 औसा तालुक्याच्या शिवसेना तालुका प्रमुख पदी दिनांक 23 सप्टेंबर 2022 शुक्रवार रोजी लातूर येथे त्यांची निवड झाली. लातूर जिल्ह्याचे जिल्हा  संपर्कप्रमुख बालाजी काकडे,  लातूरचे मा. जिल्हाप्रमुख अॅडवोकेट बळवंत  जाधव, लातूरचे जिल्हा उपप्रमुख मा. रोहित पाटील, लातूरचे लातूर जिल्हा सल्लागार प्राध्यापक  सूर्यभान जाधव, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांची लातूर येथे निवड करण्यात आली असून त्यांना तसे नियुक्तीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. गणेश माडजे यांच्या तालुका अध्यक्ष पदाच्या निवडी बद्दल औसा शहर व तालुक्यातील शिवसेना औसा तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. येणाऱ्या काळात जनसामान्य शेतकरी शेतमजूर अल्पसंख्यांक, दलित, पीडित, आदिवासी यांना मदत करणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शिवसेना हा जनसामान्यांचा गोरगरिबांचा न्याय हक्कासाठी लढा देणारा पक्ष असून मला त्याचा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी पूर्वी विविध पक्ष संघटनावर कार्याचा ठसा उमटविला असून ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. क्षत्रिय मराठा समाजाचे महाराष्ट्राचे उपप्रमुख म्हणून त्यांनी उत्तम कार्य केलेले आहे आणि आता त्यांना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे, म्हणून जनसामान्य लोकांची बुलंद तोफ म्हणून त्यांचा कार्याचा येणारा काळ गाजणार आहे. अशाप्रकारे सर्वत्र त्यांच्या कार्याची दखल घेतली जाणारा असून उद्या औसा येथील रेस्ट हाऊस मध्ये लातूरची सर्व मान्यवर पदाधिकारी मंडळी त्यांच्या सत्कारासाठी तालुका आणि शहराच्या वतीने होणाऱ्या सत्कार सोहळ्याला ते उपस्थित राहून  गणेश माडजे यांना  शुभेच्छा देणार आहेत. याप्रसंगी औसा तालुक्यातील जुन्या नवीन सर्व तमाम शिवसेनेकांनी एकत्रित सत्कार सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments