फॉक्सकॉन वेदांत प्रकल्प गुजरातला पळवून नेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करीत निषेध मोहीम
औसा प्रतिनिधी
फॉक्सकॉन वेदांता दिड कोटीचा मोठा प्रकल्प मंजूरीसाठी अंतिम टप्प्यात होता तो प्रकल्प सध्या असलेल्या शिंदे-फडवणीस सरकारने महाराष्ट्रातून गुजरातला पळवला व लाखभर भूमिपुत्र नोकरीपासून वंचित राहिले म्हणून औशात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने दिनांक 21 संप्टेंबर बुधवार रोजी औसा तुळजापूर रस्त्यावर आंदोलन करीत निषेध मोहीम राबविण्यात आली.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील दादा गव्हाणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रशांत कदम यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव सुलेमान शेख, लातूर जिल्हाध्यक्ष सय्यद मुस्तफा, लातूर शहराध्यक्ष विशाल विहीरे आणि पदाधिकाऱ्यांनी औसा येथे महाविद्यलयात आंदोलन करत विनंती पत्र लिहीत स्वाक्षरी मोहीम केली. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती.विद्यार्थ्यांनीही पत्रांवर सह्या करून सहभाग नोंदविला.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे, प्रदेश सरचिटणीस अमित कुटे, प्रदेश उपाध्यक्ष आशिष वाघमारे, युवक तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत,शहराध्यक्ष संतोष औटी ,मा नगरसेवक मेहराज शेख, गोविंद जाधव ,माजी नगरसेविका सौ किर्ती ताई कांबळे व इतर असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments