आकाश बायजुज च्या वतीने मुलींच्या सक्षमीकरणासाठी एज्युकेशन फॉर ऑल केले लॉन्च 
औसा प्रतिनिधी
 आकाश बायजुज यांच्या प्रमुख राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा नीट चा 2022 चा भाग म्हणून समाजातील 2000 वंचित मुलींना मोफत नीट आणि जेईई कोचिंग आणि शिष्यवृत्ती ची ऑफर करणार आहे अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. भारत सरकारच्या आजादी का अमृत महोत्सव उपक्रमाचे औचित्य साधून चाचणी पूर्व तयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रेसर असलेल्या आकाश बायजुज खाजगी कोचिंग क्षेत्रातील विद्यार्थिनींच्या सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठी मोहीम आयोजित करत आहे. एज्युकेशन फॉर ऑल या उपक्रमातून उच्च शिक्षण तसेच वंचित कुटुंबातील सुमारे 2000 सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेषता मुलींना मोफत नीट आणि जेईई कोचिंग आणि शिष्यवृत्ती प्रदान करणारा देशव्यापी प्रकल्प राबविणार असल्याची माहिती त्यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील एक मुलगी किंवा एकल पालक आई असलेल्या कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यासाठी प्राधान्य असणार आहे. प्रकल्पानुसार सर्व मान्यता प्राप्त आकाश बाजूस संस्थेची प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षा नॅशनल टॅलेंट हंट 2022 ही दिनांक 5 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत देशभरात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. एज्युकेशन फॉर ऑल उपक्रमाच्या शिष्यवृत्ती  नॅशनल टॅलेंट हंट परीक्षा शिष्यवृत्ती व्यतिरिक्त आहेत. पूर्वीप्रमाणेच गुणवंत विद्यार्थ्यांना 100  टक्के पर्यंत शिष्यवृत्ती तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना रोख पारितोषिके प्रदान करणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व्यतिरिक्त पाच विद्यार्थी पालकासह एन ए एस ए ची मोफत सहल देखील जिंकता येणार आहे. लॉन्च झाल्यापासून 33 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ केली आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांची ओळख व्हावी म्हणून आकाश बायजूस निवडक एनजीओ सोबत भागीदारी करणार असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील फक्त मुलगी आणि एकल पालक आई असलेल्या विद्यार्थ्यांना नामनिर्देशित करू शकतात. आकाश बायजूचे पॅन इंडिया नेटवर्क आहे यामध्ये जवळपास 285 केंद्र असून देशातील कोणत्याही कोचिंग संस्थेसाठी सर्वाधिक आहे. प्रत्येक केंद्रात सरासरी नऊ वर्ग चालवले जाणार आहेत. एज्युकेशन फॉर ऑल उपक्रमावर बोलताना आकाश बायजूचे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले इतक्या दिवसापासून या उद्योगात राहून वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या आकांक्षा आपल्या देशात वाढत असल्याने आपण हा उपक्रम घेत आहोत. आमच्या तरुण पिढीला या दोन क्षेत्राबद्दल आणि स्व विकास व सामाजिक योगदानासाठी परवडणाऱ्या संधीबद्दल त्यांना भीतीयुक्त आदर आहे, तथापि असे लाखो विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग परवडत नाही. तसेच त्यांची प्रवेश परीक्षेत अपयशी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परवडणाऱ्या समस्येला जोडणारा मुद्दा म्हणजे लिंग असमानता जिथे कुटुंब एका विशिष्ट इयत्ता परीक्षा मुलींच्या शिक्षणावर जास्त खर्च करण्यासाठी पुढे येत नाही. यासंदर्भात वंचित समाजातील विद्यार्थ्यांचे आणि सर्वसाधारणपणे मुलींचे मनोधैर्य कमी होते. एज्युकेशन फॉर ऑल च्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक अभ्यासक्रमाचा कोचिंग संधीचा विस्तार आणि व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये इयत्ता सातवी आणि नववी विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, आणि मानसिक क्षमता या विषयाचे प्रश्न असतील. वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता समाविष्ट आहे. तर याच वर्गातील अभियांत्रिकी इच्छुकासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि मानसिक क्षमता समाविष्ट आहे. इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट चे उद्दिष्ट असून त्यांचे प्रश्न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आणि प्राणीशास्त्र, यावर आधारित आहेत. अभियांत्रिकी इच्छुका साठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि गणितावर आधारित प्रश्न असतील अशी ही माहिती त्यांनी दिली. आकाश बायजुज ही परीक्षा तयारी उद्योगातील 33 वर्षाहून अधिक ऑपरेशनल अनुभवासह कंपनीकडे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आणि अनेक फाउंडेशन स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा ऑलिंपियाड्स सह 285 आकाश बायजूस केंद्राचे पॅन इंडिया नेटवर्क मोठ्या संख्येने निवडी असून वर्षभरात 3 लाख 30  हजार पेक्षा जास्त आहेत. आकाश बायजूसमूहाकडे थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेड तसेच जगातील सर्वात मोठी खाजगी इक्विटी फॉर्म ब्लॅक स्टोन द्वारे गुंतवणूक असल्याची ही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments